कोकण

साने गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देवरुखमध्ये लेख स्पर्धा

CD

देवरूखमध्ये लेख स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ६ ः : श्री सद्‍गुरू लोकमान्य वाचनालय, देवरूख यांच्या वतीने माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. सानेगुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नववी खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. साहित्य, सामाजिक जाणीव आणि वैचारिक लेखनाला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असून, अधिकाधिक साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केले आहे.
यंदा स्पर्धेसाठी दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत. ‘वर्तमान जनआंदोलनांची वास्तवता’ आणि ‘डॉ. विजया मेहता यांचे नाट्य चळवळीतील योगदान’ या दोन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांनी लेख लिहायचा आहे. लेखाची शब्दमर्यादा किमान १२०० तर कमाल १५०० शब्दांची ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील लेखांचे मूल्यमापन विषयाची खोली व विस्तार, मांडणी, भाषा शैली, आकर्षक व अलंकारिक, शुद्धलेखन आणि सर्वसामान्य प्रभाव अशा एकूण १०० गुणांच्या निकषांवर केले जाणार आहे. लेख कागदाच्या एका बाजूला समास सोडून सुवाच्च हस्ताक्षरात किंवा टंकलिखित स्वरूपात सादर करावा. या स्पर्धेचे लेख ३० ऑगस्टपर्यंत वाचनालयात कार्यालयीन वेळेत ग्रंथपालांकडे जमा करता येतील. तसेच कुरिअर, टपाल किंवा वाचनालयाच्या ई-मेलवरही लेख पाठवण्याची सुविधा उपलब्ध असून, ई-मेलद्वारे पाठवण्यात येणारा लेख युनिकोडमध्ये टंकलिखित असावा. या लेखासोबत स्वतंत्र कागदावर स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता व दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा; मात्र स्पर्धेच्या लेखावर कोणत्याही ठिकाणी स्पर्धकाचे नाव किंवा ओळख दर्शवणारी माहिती लिहू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना चिन्ह आणि पक्ष प्रकरणी आजची सुनावणी संपली

Mumbai Metro: मेट्रो-५ प्रकल्पाला अखेर गती! भोईरवाडी-उल्हासनगरसाठी एमएमआरडीएच्या निविदा

Post Recruitment 2026: भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी! महिन्याला ६३ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Thane Fraud Arrest: ९३ लाखांच्या फसवणुकीतील फरार दोघे अप्पा बळवंत चौकातून अटकेत; पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई, ठाणे पोलिसांकडे ताबा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

SCROLL FOR NEXT