कोकण

कुटगिरी साकवाचे अंदाजपत्रक तत्काळ सादर करा

CD

- rat६p७.jpg-
6O55613
गुहागर ः कुटगिरी साकवाची पाहणी करताना पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर. सोबत ग्रामस्थ आणि अन्य पदाधिकारी.
---
कुटगिरीच्या नव्या पुलाला चालना
सभापती पोळेकर यांच्याकडून दखल ; प्रस्ताव सादर करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ६ ः गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी येथील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी प्रशासनाला तातडीने नवीन पुलाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी लोखंडी साकव कोसळल्याने कुटगिरी या दुर्घटनेत १० ते १२ गुरे जखमी झाली तर एका बैलाचा मृत्यू झाला. सुदैवाने, मानवी जीवितहानी टळली असली तरीही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच सभापती पोळेकर यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले होते. जखमी जनावरांवर त्वरित उपचार करण्यात यावेत तसेच मृत जनावराच्या शेतकऱ्याला शासकीय मदत तातडीने देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिली होती. त्यानुसार प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामे करून शासकीय मदत दिली. पंचायत समितीचे उपसभापती नीलेश सुर्वे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करत प्रशासनामार्फत आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेतला होता. त्यानंतर सायंकाळी पोळेकर यांनी स्वतः भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी उपअभियंता आशुतोष सरदेसाई, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर तसेच संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने नवीन पुलाचे काम कोणत्याही विलंबाशिवाय सुरू व्हावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा शब्द पोळेकर यांनी ग्रामस्थांना दिला.
---
पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा...
पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नवीन पूल लवकरात लवकर मंजूर करून त्याचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पोळेकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT