

ST Bus Breakdown In Rajgad Leaves 80 Passengers Stranded For Four Hours Bus Service Disrupted In Rural Pune
esakal
-मनोज कुंभार
वेल्हे,(पुणे): मार्गासनी(ता.राजगड)येथे दुर्गम भागातील गृहिणी एसटी रविवार (ता. 20) रोजी बंद पडल्यामुळे सुमारे 80 प्रवाशांना चार तास रखडावे लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर घिसर ते भोर आगाराकडे जाणारी एसटी बस स्वारगेटकडे वळवल्यानंतर प्रवाशांना पुण्याकडे जाण्याची सोय झाली.