कोकण

साठ हजार विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा

CD

विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा
शिक्षण विभाग ; पहिल्या गणवेशासाठी केवळ २४० रुपयेच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन पावणेदोन महिने उलटले तरीही जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील ६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप दुसऱ्या गणवेशासाठीचा निधी मिळालेला नाही. त्याचबरोबर बूट व सॉक्ससाठी मंजूर असलेला निधी आलेला नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा महत्त्वाचा आधार आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन शासनाकडून सातत्याने दिले जात असले, तरी प्रत्यक्षात योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड ते पावणेदोन महिने उलटले असतानाही दुसऱ्या गणवेशाचा निधी जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही. शासनाच्या नियमानुसार शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक मोफत गणवेश उपलब्ध होणे अपेक्षित आहे; मात्र, प्रत्यक्ष निधी वितरणाच्या प्रक्रियेत शासनाने स्वतःच्या धोरणालाच हरताळ फासल्याची भावना शिक्षक व पालक व्यक्त करत आहेत. एका गणवेशासाठी मंजूर असलेली ३०० रुपयांची रक्कम सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवरही अपुरी मानली जात असताना त्यातूनही केवळ २४० रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित ६० रुपयांसाठी सीएसआर निधी किंवा लोकवर्गणीतून व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आल्याने शिक्षकांवर अतिरिक्त आर्थिक व प्रशासकीय ताण पडत आहे. परिणामी, अनेक शाळांमध्ये पहिल्या गणवेशाचे वाटपही अद्याप पूर्ण झालेले नाही.
याशिवाय, दुसऱ्या गणवेशासाठी जिल्ह्यातील ६० हजार ४७६ पात्र विद्यार्थ्यांचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. बूट व सॉक्ससाठी प्रतिविद्यार्थी मंजूर असलेले १७० रुपयेही वितरित झालेले नसल्याने ऐन पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना अनवाणी किंवा तुटक्या चपला घालून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून शासनाने तातडीने निधी वितरित करावा, अशी मागणी होत आहे.
----
गणवेशासाठी पात्र विद्यार्थी संख्या
तालुका* विद्यार्थी संख्या
मंडणगड* २,९०४
दापोली* ६,४६३
खेड* ६,०९०
चिपळूण* ७,८३४
गुहागर* ५,६४८
संगमेश्वर* ७,१९३
रत्नागिरी* १२,१६६
लांजा* ५,०७९
राजापूर* ७,०७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA VS PAKISTAN : तारीख नोट करून घ्या! सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर... क्रिकेटचा हा महामुकाबला कुठे होणार?

Liquor Flavour Row: फ्लेवर वाद चिघळला! FSSAI च्या नोटिसांना दारू कंपन्यांचे हायकोर्टात आव्हान; नियमांवरून नवा संघर्ष

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: प्रत्येकाने संविधानावर बोलायलाच हवे - पंकजा गोपीनाथ मुंडे

SCROLL FOR NEXT