कोकण

परिवर्तन पुस्तक प्रकाशन

CD

‘परिवर्तन’मधून ज्ञानेश्वरीचा प्रवास

डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या लघुकादंबरीचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : ‘ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर हा ग्रंथ फक्त वृद्धावस्थेत वाचायचा असे नाही तर सर्वांनी वाचायचा आहे, इतकी त्याची ताकद आहे. हे उमगल्याने ज्ञानेश्वरीचे सार साध्या-सोप्या भाषेत नव्या पिढीला समजावे यासाठी ‘श्री’ या पात्राची निर्मिती करून कोकणातील पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरीवर ‘परिवर्तन’ ही कादंबरी लिहिली, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ, लेखक डॉ. शरद प्रभुदेसाई केले.
डॉ. प्रभुदेसाई यांच्या ‘परिवर्तन’ या लघुकादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी, नाटककार श्रीकृष्ण जोशी, प्रसिद्ध गझलकार देविदास पाटील यांच्या हस्ते झाले. जनसेवा ग्रंथालयाच्या हा कार्यक्रम माधवराव मुळ्ये भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी डॉ. प्रभुदेसाई बोलत होते.
डॉ. जोशी म्हणाले, डॉ. प्रभुदेसाई यांची रोखठोक वृत्ती जशी आहे तशीच रोखठोक शैली परिवर्तनमधून दिसून येते. ज्ञानेश्वरीचा खूप मोठा आशय त्यांनी परिवर्तनमधून लघुकादंबरीतून मांडला आहे. त्याच्या लघुकादंबरीची रचना पाहता त्यांनी यापुढे बृह्दकादंबरीच्या निर्मितीकडे लक्ष घालावे.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जनसेवा ग्रंथालयाचे चे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी, कार्यवाह ओंकार मुळ्ये, डॉ. दिलीप पाखरे, डॉ. संतोष बेडेकर, परिक्षक शैलजा लिमये, प्रतिभा प्रभुदेसाई, जनसेवा ग्रंथालय कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, ग्रंथपाल पटवर्धन, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो-५ प्रकल्पाला अखेर गती! भोईरवाडी-उल्हासनगरसाठी एमएमआरडीएच्या निविदा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Post Recruitment 2026: भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी! महिन्याला ६३ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Marathi News Live Updates : वस्तुस्थिती स्पष्ट असून आणि या न्यायालयाच्या निकालांची ती कवेत येत असूनही, अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेतला नाही - सिब्बल

SCROLL FOR NEXT