swt६१.jpg
५५६४५
मिलिंद मोर्ये, अभय कुळकर्णी, प्रवीण जोग, योगेश गुरव
देवगड केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट
असोसिएशन अध्यक्षपदी मोर्ये
बिनविरोध निवड ः सचिवपदी कुळकर्णी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अंतर्गत येणार्या तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तालुध्यक्षपदी मिलिंद मोर्ये यांची तर सचिवपदी अभय कुळकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथे झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.
येथील ज्येष्ठ औषध व्यावसायिक श्रीपाद कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. निरीक्षक तथा जिल्हा संघटनेचे सचिव संजय सावंत (वैभववाडी) यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२६-२९ या कालावधीसाठी तालुका नूतन कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य निवड करण्यात आली. नूतन तालुका कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष मोर्ये, उपाध्यक्ष देवेंद्र जेठे, सचिव अभय कुळकर्णी, खजिनदार राहुल शिरसाट, सहसचिव विजय पडवळ, संघटन सचिव सनित आचरेकर यांचा समावेश आहे, तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी प्रवीण जोग व योगेश गुरव यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. मोर्ये यांनी संघटनेच्या सदस्यांचे आभार मानत औषध व्यावसायिकांच्या समस्या सोडविणे, औषध वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे, नव्या पिढीतील फार्मासिस्ट व केमिस्ट यांना संघटनेशी जोडणे आणि संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. सभेनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा किशोर कुळकर्णी व संजय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेला तालुक्यातील सुमारे २५ सदस्य उपस्थित होते. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी तालुका कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.