कोकण

विषयसूचीवरील आक्षेपामुळे देवगड नगरपंचायत सभा रद्द

CD

विषयसूचीवरील आक्षेपामुळे
देवगड नगरपंचायत सभा रद्द
नगरसेवकांची हरकत : ठेकेदाराच्या देयकाबाबत सभा बोलावणे चुकीचे
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या बोलावण्यात आलेल्या विशेष सभेतील विषय सुचीवरील एका विषयालाच नगरसेवकांनी हरकत नोंदवून सभा रद्द करण्याची मागणी केली. एखाद्या ठेकेदाराच्या देयकाच्या विषयाच्या अनुषंगाने विशेष सभा बोलावण्याचा सुचीवरील विषयच पूर्णपणे चुकीचा असल्याकडे लक्ष वेधून नगरसेवकांनी सभा रद्द केली.
येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीची विशेष सभा नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे उपस्थित होते. नगरपंचायतीच्या ए.एच.पी. प्रकल्पाची माहिती विशद करणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे. तसेच एका ठेकेदारामार्फत पाणी पुरवठा विभागाच्या करण्यात आलेल्या कामांपैकी प्रलंबित असलेल्या देयकांबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे अशा दोन विषयासाठी ही विशेष सभा आज बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरूवातीलाच ठेकेदाराच्या देयकाच्या विषयावरून नगरसेवकांनी हरकत घेतली. सभेच्या पटलावर ठेवण्यात आलेला हा विषयच पूर्णपणे चुकीचा असल्याचे तसेच अशा विषयासाठी खास सभा घेता येते का? असा मुद्दा नगरसेविका प्रणाली माने यांनी मांडला. एखाद्या ठेकेदाराचे देयक देण्याच्या विषयासाठी विशेष सभा घेणे संयुक्तिक आहे का? असा प्रश्‍नही उपस्थित केला. या विषयाच्या अनुषंगाने प्रशासनाने नगरसेवकांना टिप्पणी का दिली नाही? अशीही विचारणा केली. सौ. माने यांनी मांडलेल्या मुद्याला अन्य नगरसेवकांनीही साथ देत सभेच्या सुचीवरील विषयाला हरकत घेतली. या विषयासाठी सभा का बोलावली असा मुद्दा प्रशासनाला विचारण्यात आल्याने त्यांनी त्याबाबतची माहिती दिली. दरम्यान, संबधित ठेकेदाराचे सभागृहात आगमन झाले. हाच धागा पकडून पुन्हा सौ. माने यांनी संबधित ठेकेदार नगरसेवकांच्या सभेला उपस्थित राहू शकतात का? त्यांना सभेला कोणी बोलावले? असे प्रश्‍नही उपस्थित केले गेले. यावरील चर्चा झाल्याने संबधित ठेकेदाराने आपणास नगरपंचायतीनेच सभेला उपस्थित राहण्यासाठी लेखी कळवल्याने आपण उपस्थित राहिल्याचे सांगितले. तसेच सभेतील अन्य एका विषयासाठीची माहिती देणारे अधिकारी कुठे दिसत नाहीत? अशीही नगरसेवकांनी विचारणा केली. अखेर विषय सुचीवरील विषयावर हरकत नोंदवून नगरसेवकांनी मागणी केल्याने सभा रद्द करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT