-rat६p३.jpg-
26O55594
देवरूख ः पाटगावजवळ येथे खचलेली मोरी.
-----
पाटगावनजीक मोरी खचली
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ६ ः रत्नागिरी–पांगरी–देवरूख मार्गावरील पाटगावनजीक असलेल्या मोरीचा काही भाग आणि लगतची बाजूपट्टी खचल्याने या महामार्गावर अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघाताची टांगती तलवार असतानाही संबंधित प्रशासनाने केवळ लाल रंगाची फीत (वॉर्निंग टेप) बांधून तात्पुरती मलमपट्टी केल्याने वाहनचालक आणि स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या या मार्गावरून वाहनांची सतत मोठी वर्दळ सुरू असते. ज्या ठिकाणी ही मोरी खचली आहे तो भाग वळणावर असल्याने धोका अधिकपटीने वाढला आहे. मुसळधार पाऊस किंवा रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेचा आणि खचलेल्या बाजूपट्टीचा वाहनचालकांना योग्य अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने थेट दरीत किंवा मोरीत कोसळून मोठा अपघात होण्याची गंभीर भीती वर्तवली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ फीत बांधून जबाबदारी न झटकता या जागेची तत्काळ पाहणी करावी. मोरीची कायमस्वरूपी दुरुस्ती करून त्या ठिकाणी संरक्षक कठडे (क्रॅश बॅरियर) आणि स्पष्ट दिसणारे दिशादर्शक इशारा फलक उभारावेत, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे.
-----
कोट १
पाटगावजवळील हा भाग अत्यंत धोकादायक बनला आहे. दिवसा खचलेला भाग कसाबसा नजरेस पडतो; मात्र रात्री किंवा मुसळधार पावसात ही खचलेली बाजूपट्टी अजिबात दिसत नाही. प्रशासनाने केवळ चेतावणी फीत बांधून न थांबता इथे तातडीने पक्के काम करावे
-अभिजित राऊत, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.