कोकण

सातार्डा हायस्कूलचे विद्यार्थी शेतीत दंग

CD

swt616.jpg
55677
कवठणी ः सातार्डा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतीचा अनुभव घेतला.

सातार्डा हायस्कूलचे विद्यार्थी शेतीत दंग
आरोंदाः विद्यार्थ्यांना शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे आणि कृषी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूल, सातार्डा यांच्या वतीने ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कवठणी गावातील मुठयेवाडी येथे आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीची विविध कामे अनुभवली. या कार्यक्रमाला प्रशालेचे उपाध्यक्ष तथा कवठणीचे सरपंच अजित कवठणकर, उपसरपंच श्रद्धा कवठणकर, मार्गदर्शक युवराज भुईंबर, मंडळ कृषी अधिकारी पल्लवी सावंत, सहाय्यक कृषी अधिकारी वैभव ननवरे, कृषी सेवक, हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, शिक्षक गणेश कुंदे, सुभाष नाईक, श्री. शिर्के, सृष्टी राऊळ, प्राजक्ता धूपकर, कवठणी शाळेचे मुख्याध्यापक श्री. लाड आणि गावातील प्रगतशील शेतकरी बापू मुठये, अरविंद सावंत व प्रशांत सावंत उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन शेतीतील विविध कामांची माहिती घेतली. विविध शेतगीते सादर करत भात लावणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT