कोकण

वसतिगृहांमध्ये निःशुल्क प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

CD

वसतिगृहांमध्ये निःशुल्क
प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे मालवण, कणकवली आणि वेंगुर्ले येथील तीन, तसेच मागासवर्गीय मुलींचे मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले व देवगड येथील पाच अशा एकूण आठ शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, व्यायामशाळा (जिम) तसेच इंटरनेट (वाय-फाय) सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम येणार - भरणे

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT