कोकण

चिपळूण शहरातील रस्त्यांची दुरवस्था

CD

-rat६p४.jpg-
26O55595
चिपळूण ः शहरातील राधाकृष्ण नगर भागात रस्त्याला पडलेले खड्डे.
-----
चिपळुणातील रस्त्यांची दुरवस्था
नागरिक त्रस्त; कोट्यवधींचा निधी खर्च
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः चिपळूण शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः राधाकृष्ण नगर भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्थानिक रहिवाशांमधून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी चिपळूण शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि डागडुजी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो; मात्र, पावसाळा सुरू होताच रस्त्यांची वाट लागते आणि डांबर वाहून जाते. चिपळूण शहरात एकतरी उत्तम दर्जाचा रस्ता दाखवा, असे म्हणण्याची वेळ सध्या चिपळूणकरांवर आली आहे. सध्या शहरातील पॉवरहाऊस ते मध्यवर्ती बसस्थानक रस्ता आणि चिपळूण रेल्वेस्टेशन रोड या प्रमुख मार्गांवरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. राधाकृष्ण नगर परिसरातील खड्ड्यांमुळे रोज किरकोळ अपघात घडत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन चिपळूण नगरपालिका प्रशासनाने किमान तात्पुरत्या स्वरूपात तरी खड्डे भरून रस्त्याची दुरवस्था सुधारावी, अशी आग्रही मागणी राधाकृष्ण नगरमधील रहिवाशांनी केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT