कोकण

मत्स्य व्यवसाय क्षेत्रात माजी विद्यार्थ्यांचे काम कौतुकास्पद

CD

-rat६p१२.jpg-
P26O55635
रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ. राघवेंद्र पै. सोबत डॉ. अनिल पावसे, डॉ. विजय निंबाळकर, डॉ. केतन चौधरी, डॉ. आसिफ पागारकर आदी.
----
मत्स्य क्षेत्रात करिअरच्या संधी
डॉ. अनिल पावसे ः महाविद्यालयाचा ४५ वा वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व्यवसाय क्षेत्रातील मोठे योगदान आहे. ४४ वर्षांमध्ये महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध मत्स्य संवर्धन, संशोधन, शासकीय क्षेत्रात कार्यरत असून, मत्स्य संवर्धनाबरोबर खाद्य, औषधे, विक्री, मत्स्यशेती यंत्रसामग्री आदी कंपन्यांमध्ये व्यवस्थापन क्षेत्रात मत्स्य पदवीधारकांना मोठी मागणी असल्याचे प्रतिपादन मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे केले.
शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या ४५व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विजय निंबाळकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य जलशास्त्र व मत्स्य जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसिफ पागारकर, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान व मत्स्यविस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. दबीर पठाण, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्येचे प्र. शास्त्रज्ञ डॉ. किरण मालशे, कृषी संशोधन केंद्र, शिरगांवचे प्रमुख डॉ. सोनोने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांचा सत्कार माजी अधिष्ठाता डॉ. राघवेंद्र पै यांच्या हस्ते करण्यात आला.
विविध स्पर्धांमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. सुहास वासावे यांनी आभार मानले.
---
संवाद सत्र रंगले
दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे आयसीएआर, सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक डॉ. अजय नाखवा, एमटीए नेटवर्क (चीन) संचालक धनराज सिंग ठाकूर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांच्यासोबत संवाद कार्यक्रम झाला. यात मत्स्यशास्त्रातील नोकरी, व्यवसाय व उद्योगसंधींवर त्यांनी मार्गदर्शन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT