कोकण

संगीत रत्न पुरस्कारासाठी संजय गावडे यांची निवड

CD

swt७४.jpg
५५८५७
संजय गावडे

संगीत रत्न पुरस्कारासाठी
संजय गावडे यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ७ : ओंकार प्रासादिक भजन मंडळ, सरमळे येथील प्रसिद्ध भजनकार तथा बुवा संजय कृष्णा गावडे यांची राष्ट्रीय संगीत रत्न पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या अखंड भजनसेवेचा, संगीत क्षेत्रातील योगदानाचा तसेच सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा गौरव म्हणून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे वितरण उद्या (ता.८) सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, ओरोस (सिंधुदुर्गनगरी) येथे आयोजित कोकण बुक ऑफ रेकॉर्ड, यशस्वी फाउंडेशन सिंधुदुर्ग प्रस्तुत कोकण कला साहित्य गौरव संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संजय गावडे बुवा यांनी गेली अनेक वर्षे भजन, डबलबारी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संगीत कलेची अविरत सेवा केली आहे. त्यांच्या मधुर गायनशैलीमुळे आणि प्रभावी निरूपणामुळे त्यांनी केवळ ओटवणे परिसरातच नव्हे, तर संपूर्ण सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या भजनातून भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश सातत्याने दिला जातो.त्याच्या या सेवाभावाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

सई ताम्हणकरला जेवणात आवडतो हा मराठमोळा पदार्थ; फक्त सांगलीकरच सांगू शकतील अस्सल चव; तुम्ही कधी ऐकलाय का?

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागणार नाही - मुख्यमंत्री

Dombivli Politics: डोंबिवलीत कार्यकर्त्यांची 'घरवापसी'! भाजपात गेले, पस्तावले अन् पुन्हा मनसेत परतले, राजू पाटलांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT