कोकण

नव्या पोलिस अधिकाऱ्यांचे शिंदे शिवसेनेतर्फे स्वागत

CD

swt76.jpg
55859
सावंतवाडी : येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत व पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे शिंदे शिवसेना शिष्टमंडळाने स्वागत केले.

नव्या पोलिस अधिकाऱ्यांचे
शिंदे शिवसेनेतर्फे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : येथील उपविभागीय पोलिस अधिकारीपदी राजेश भागवत व पोलिस निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आंबोली घाटातील वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
​भेटीदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि आंबोली घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून निश्चितपणे योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. पोलिस ठाण्यात पुरेशा पोलिस कुमकची आवश्यकता असून त्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. यावेळी ​शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या हस्ते दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा व नारायण राणे यांनी आंबोली घाटातील सुरळीत वाहतुकीबाबत विशेष चर्चा केली. ​या प्रसंगी गजानन नाटेकर, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, संजय पालकर, विश्वास घाग, एकनाथ हळदणकर आदी उपस्थित होते.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

सई ताम्हणकरला जेवणात आवडतो हा मराठमोळा पदार्थ; फक्त सांगलीकरच सांगू शकतील अस्सल चव; तुम्ही कधी ऐकलाय का?

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागणार नाही - मुख्यमंत्री

Dombivli Politics: डोंबिवलीत कार्यकर्त्यांची 'घरवापसी'! भाजपात गेले, पस्तावले अन् पुन्हा मनसेत परतले, राजू पाटलांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT