कोकण

जीवनशाळा उपक्रमात अनुभवले शेतीजीवन

CD

जीवनशाळा उपक्रमात
अनुभवले शेतीजीवन
चिपळूण - रोटरॅक्ट क्लब ऑफ लोटे यांच्यावतीने ‘जीवनशाळा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून क्लबच्या सदस्यांनी प्रत्यक्ष शेतीकामात उतरून शेतीजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हा विशेष उपक्रम प्रकाश भेकरे यांच्या शेततळ्याच्या परिसरात उत्साहात पार पडला. आजच्या डिजिटल युगात तरुणपिढी शेती आणि निसर्गापासून दूर जात असताना, त्यांना शेतीचे महत्त्व कळावे आणि मातीशी नातं घट्ट व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी रोटरॅक्ट क्लबच्या तरुण सदस्यांनी स्वतः शेतात उतरून भातलावणीचा आनंद घेतला. चिखलात उतरून राबताना सदस्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. लावणीचे काम करत असताना सदस्यांनी लोकसंस्कृतीचा वारसा जपत विविध पारंपरिक गाणी व लोकगीते सादर केली. या गाण्यांमुळे संपूर्ण परिसर आनंदी आणि उत्साही वातावरणाने दुमदुमून गेला होता.
---
घाणेखुंटमधील
शाळांना वह्या वाटप
चिपळूण ः लोटे पंचायत समिती गणाचे सदस्य अजय चाळके यांच्यामार्फत घाणेखुंटमधील जिल्हा परिषद शाळांना वह्या वाटप केल्या. आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची सुरवात कशी करावी तर एका पुण्याने करावी म्हणून शाळांना शैक्षणिक साहित्य देऊन शुभारंभ केला, असे अजय चाळके यांनी सांगितले. यापुढेही पंचायत समितीच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी घाणेखुंट सरपंच राजू ठसाळे, रवी खांबल, युवासैनिक तुषार खताते, बदरूद्दीन सुर्वे उपस्थित होते.
--------------
डीबीजेत एमलिब
अभ्यासक्रम सुरू
चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र चालवले जाते. या केंद्रात बीए, बीकॉम, बीलिब, योग शिक्षक आदी अभ्यासक्रम सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांकरिता एमलिब हा अभ्यासक्रम नव्याने सुरू केला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी बीलिब हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी केंद्राशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. माधव बापट, केंद्र संयोजक प्रा. विनायक बांद्रे, ग्रंथपाल डॉ. सुधीर मोरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter List : मतदार यादीतून वगळलेल्या मतदाराला पुन्हा मिळणार स्थान; फॉर्म ६ भरून द्यावा लागणार पुरावा

AUSTRALIAN CRICKET AWARDS : ट्रॅव्हिस हेडने सलग दुसऱ्या वर्षी जिंकला मानाचा पुरस्कार! वॉर्नर, पाँटिंग, वॉटसन यांच्या पंक्तित स्थान

Abhijit Dipke: मोहन भागवतांच्या 'जेन-झीं'बद्दलच्या विधानावर अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया; भाजपला कानपिचक्या, म्हणाले...

CM विजयचा मोठा निर्णय! आता मोबाईलवरूनच दारूची बुकिंग करता येणार; कमी पैशात दारू मिळणार?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

SCROLL FOR NEXT