55903
बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सोडवू
प्रफुल तावरे : कुडाळात क्रेडाई महाराष्ट्र साऊथ वेस्ट झोनची सभा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ : बांधकाम व्यवसायिकांना विविध स्तरांवर काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा सर्व प्रश्नांचे निराकरण क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून निश्चितच केले जाईल, असा विश्वास क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल तावरे यांनी व्यक्त केला.
क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या यजमानपदाखाली क्रेडाई महाराष्ट्र साऊथ वेस्ट झोनची चौथी सभा येथे झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल तावरे, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, जयंत ठक्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र भोईटे, दशरथ शेट्ये, शहाजी पाटील, क्रेडाई सिंधुदुर्ग अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अभिजित जैतापकर, खजिनदार अनिल साखळकर, जीवन रेगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक क्रेडाई सिंधुदुर्गचे संस्थापक व पहिले अध्यक्ष संजय पिंगुळकर, प्रकाश जैतापकर, विजय प्रभु, अमोल शिरसाट, अभय वालावलकर, तन्मय माळगावकर, बाळू अंधारी, उदय पाराळे, दादा खोजूर्वेकर, शरद सावंत, विजय तेंडोलकर ,ब्रिजेश कोठावळे, काका केसरकर, अन्वय शिरसाट, शंतनु पिंगुळकर नीरज देसाई, यांच्यासह या परिषदेला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांतील १७ क्रेडाई सिटी असोसिएशनमधील सुमारे १६० बिल्डर्स व डेव्हलपर्स उपस्थित होते. या सभेचे मुख्य उद्दिष्ट बांधकाम व्यवसायाशी संबंधित नवीन कायदे, नियम, लेखापाल विषयक बदल, विविध शहरांतील स्थानिक अडचणी आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना यांवर चर्चा करून सदस्यांना अद्ययावत मार्गदर्शन करणे हे होते.
यावेळी अध्यक्ष प्रफुल तावरे यांनी सांगितले की, प्रत्येक झोनमध्ये अशा बैठका नियमितपणे आयोजित होणे आवश्यक आहे. विविध शहरांमध्ये महसूल, नियोजन व इतर स्थानिक प्रश्न आहेत. अशा बैठकीतून हे प्रश्न मांडून त्यावर प्रभावी तोडगा काढता येईल. त्यांनी पुढील महाराष्ट्राची सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती देत सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच स्टडी टूरअंतर्गत पहिली भेट बेंगळुरू तर दुसरी चीन येथे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सीए मंगेश घाणेकर यांनी कॉर्पोरेटायझेशन: संस्थेची कार्यक्षमता आणि विकास वाढवणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी संघटनेच्या कार्याचा आणि वाटचालीचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.शंतनु पिंगुळकर यांनी आभार मानले
--------------
तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन
कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. ॲड. रोहित इरंडे (पुणे) यांनी सोसायटी आणि अपार्टमेंट कायद्याचे पालन आव्हाने आणि सर्वोत्तम कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले. सीए शिवाजीराव पाटील यांनी योग्य पार्टनरशिप व्यावसायिक रचनेची निवड: एलएलपी, कंपनी की प्रोप्रायटरशिप याबाबत माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.