कोकण

गंभीर कुपोषित बालकांसाठी सोमवारी विशेष शिबिर

CD

गंभीर कुपोषित बालकांसाठी
सोमवारी विशेष शिबिर

सकाळ वृत्तसेवा
ओरोस ता ७ : जिल्ह्यातील गंभीर कुपोषित बालकांसाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील पोषण पुनर्वसन केंद्रात १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्यावतीने याबाबत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र स्थापन केले असून, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील (गंभीर कुपोषित) बालकांचे उंची-वजन व वयानुसार वजन तपासून कुपोषणाच्या तीव्रतेनुसार मार्गदर्शन व उपचार केले जातात. या शिबिरात गंभीर कुपोषित बालकांना दाखल करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. ‘एनआरसी’मध्ये दाखल बालकांवर १४ दिवसांपर्यंत संबंधित उपचार करण्यात येणार असून, बालकांसोबत राहणाऱ्या मातांना आहार देण्यात येणार आहे. तसेच बालकांच्या पालकांना योग्य आहाराबाबत प्रशिक्षण व समुपदेशन करण्यात येणार आहे. दाखल बालकाच्या सोबत राहणाऱ्या पालकाला रोज ३०० रुपये मजुरी अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित पालकाचे बँक खाते तपशील व पासबुकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. अंगणवाडीतील नोंद असलेल्या सर्व बालकांची तपासणी व शिबिरासाठी उपस्थिती सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेला दिली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नोंद असलेल्या बालकांनाही या शिबिराच्या दिवशी संबंधित आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणीसाठी आणण्यात येणार आहे. वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या सर्व तालुक्यांतील गंभीर कुपोषित बालकांसाठी हे शिबिर आयोजित केले आहे. पालकांनी आपल्या बालकाची आरोग्य तपासणी करून आवश्यक असल्यास पोषण पुनर्वसन केंद्रातील उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Palghar News: पोषण आहाराला कात्री, डहाणूतील ३५ आश्रमशाळांमध्ये चपातीचा पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT