कोकण

कट्टा येथे आज मोफत कर्करोग चिकित्सा महाशिबिर

CD

कट्टा येथे आज मोफत
कर्करोग चिकित्सा महाशिबिर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी व्यापक जनजागृती करून आजाराचे वेळेवर निदान व उपचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कट्टा येथे उद्या (ता.८) सकाळी ९ वाजता ओम गणेश साई मंगल हॉल, कट्टा येथे भव्य मोफत कर्करोग जनजागृती व तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सेवास्पर्श फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ माहीम (डिस्ट्रिक्ट ३१४१) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्रामीण रुग्णालय (पेंडूर कट्टा) आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग (सिंधुदुर्ग) यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केले आहे. शिबिरात मुंबईच्या नामांकित टाटा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर शिबिरात उपस्थित राहून कर्करोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर निदानाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करतील. नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट चर्चा करून शंकांचे निरसन व समुपदेशन करून घेण्याची संधी मिळेल. गरजेनुसार सीबीसी, आरबीएस, एलएफटी, क्रिएटनीन आणि कॅन्सर मार्कर यांसारख्या विविध महत्त्वाच्या रक्त तपासण्या मोफत केल्या जातील. यकृताच्या आरोग्याची अचूक माहिती देणारी अत्यंत अत्याधुनिक व वेदनामुक्त ‘फायब्रोस्कॅन’ तपासणीही शिबिरात उपलब्ध असणार आहे. शिबिरासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागातील जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी आणि या मोफत वैद्यकीय उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व परिचितांनाही या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT