कोकण

हर्णैत मारहाण झालेल्या त्या युवकांना धोका

CD

-rat७p२४.jpg-
26O55870
रत्नागिरी ः हर्णै येथे झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन देताना हेमंत चाळके, गणेश गायकवाड, चिन्मय गुरव, अनुराग उतेकर, महेंद्र रघुवीर आदी.
------
हर्णैतील गडसंवर्धकांना धोका
हिंदुराष्ट्र समिती; पोलिस अधीक्षकांची घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः दापोली तालुक्यातील हर्णै येथील गोवा किल्ल्यावर गडसंवर्धन करणाऱ्या दोन युवकांना ३०-३५ युवकांनी मारहाण केली. या घटनेचा पोलिस तपास चालू आहे. त्यातील काही जणांवर अजूनही कारवाई केलेली नाही तसेच यासारख्या गंभीर प्रकरणात संशयितांची जामिनावर सुटका झाली असून, ते मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्यापासून गडसंवर्धन करणाऱ्या त्या युवकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अधीक्षकांनी दापोली पोलिसांना तत्काळ योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या भेटीवेळी हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्यावतीने जिल्हा सहसंयोजक आणि महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघाचे राज्य उपाध्यक्ष अनुराग उतेकर, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष व गोसेवा संघ रत्नागिरीचे संस्थापक व अध्यक्ष गणेश गायकवाड तसेच हर्णै गडसंवर्धन समितीचे युवक चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर उपस्थित होते. चिपळूण येथे नीट पेपरफुटी प्रकरणाबाबत आयोजित मोर्चात आक्षेपार्ह पोस्टर झळकवण्यात आली. ही पोस्टर झळकावणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले. याबाबत योग्य ती कार्यवाही करा, अशा सूचना पोलिस अधीक्षक बगाटे यांनी चिपळूण पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले! भारतात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा ताजे रेट

SCROLL FOR NEXT