कोकण

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा

CD

-rat७p२५.jpg-
26O55908
मंडणगड ः भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सतीश मोरे. शेजारी वैभव खेडेकर, अजय दळवी.
----
शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा
सतीश मोरे ः भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ : केंद्र व राज्यशासनाच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केले. भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात आयोजित उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
ग्रामीण भागातील कार्यकर्ता सक्षमपणे उभा राहावा यासाठी पक्ष नेतृत्वाने विशेष भर दिला असून आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून कोकणातील जनतेचे प्रश्न प्रभावीपणे विधानसभेत मांडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांची निर्मिती आणि शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी. स्थानिक प्रश्नांचे आकलन करून केवळ समस्या मांडण्यात न अडकता पक्षाच्या विविध मोहिमा प्रभावीपणे राबवून जनमानसात पक्षाची आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी. पक्षावरील टीकेला वस्तुनिष्ठपणे उत्तर देण्यासही कार्यकर्ते सक्षम असावेत, असेही मोरे यांनी स्पष्ट केले. बैठकीला नीलेश सुर्वे, वैभव खेडेकर, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, कोकण पदवीधर मतदार संघाचे जिल्हा सहसंयोजक अजय दळवी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT