कोकण

कशेडीसह महामार्गावरील दरडीच्या अभ्यासाठी समिती

CD

दरडींच्या अभ्यासासाठी समिती गठित
उदय सामंत ः महामार्गाचे काम अंतीम टप्प्यात, गणेशभक्तांचा प्रवास होणार सुखकर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : संपूर्ण कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनाअडथळा होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. कशेडी घाटातील दरडीसह महामार्गावर पडणाऱ्या दरडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बायपासच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न आता सुटले असून, तेथील कामे वेगात सुरू आहेत. महाड ते आरवलीदरम्यानचा मार्ग पूर्ण झाला आहे. रत्नागिरीतून अवघ्या साडेचार ते पाच तासांत पनवेल गाठणे शक्य होत आहे. उर्वरित टप्प्यांतील कामे गणपतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते लांजा या टप्प्यातील कामे प्रगतिपथावर आहेत. विशेषतः लांजा ते हातखंबा दरम्यानचा मार्ग तयार झाला असून, लांजा येथील पुलाचे व चिपळूण उड्डाणपुलाचे कामही वेगाने पुढे सरकत आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाबाबत माहिती देताना ते म्हणाले, सध्या रत्नागिरी ते आंबा हे अंतर अवघ्या पाऊण ते एक तासात पार करता येते. मलकापूर आणि बांबवडे येथील बायपासची कामे पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीहून कोल्हापूरला अवघ्या दीड ते पावणेदोन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. कशेडी घाटात दरड कोसळलेली नसून मुख्य रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील डोंगर सरकून माती रस्त्यावर आली होती.
---
कायमस्वरूपी उपाय शोधणार
महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा भूस्खलनाच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यास समिती नेमण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानुसार रस्त्याच्या कामात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, अशी माहितीही सामंत त्यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT