कोकण

एसटी चालक, वाहकांना दुपारीच ड्युटी अलोकेशन कळेल

CD

एसटी कर्मचाऱ्यांना दुपारी ड्युटी वाटप
अश्वजित जानरावः ‘सेवाशक्ती’ संघटनेसोबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : राजापूर, लांजा, गुहागर, खेड, मंडणगड एसटी आगारामध्ये वेळेवर कर्तव्यांचे वाटप (ड्युटी अलोकेशन) लावले जात नसल्याने उद्या आपली ड्यूटी काय आहे, हे ग्रामीण भागातील चालक, वाहकांना कळत नाही. त्यामुळे काहीवेळा वाद निर्माण होतात. यावर उपाय म्हणून रोज दुपारी १२ वाजता ड्यूटी अलोकेशन जाहीर करण्याचे आश्वासन रत्नागिरी एसटी विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी सेवाशक्ती संघर्ष संघटना रत्नागिरी विभागाला दिले
सेवाशक्ती संघर्ष संघटना रत्नागिरी विभागाची बैठक विभाग नियंत्रक जानराव यांच्यासोबत झाली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष संतोष बोरकर, उपाध्यक्ष संजीव बने, सचिव वसंत कांबळे, नीलेश आखाडे व आगार पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी ओव्हरटाईमबाबत चर्चा झाली. यामध्ये जादा बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्युटीला वापरले जाते. त्यामुळे महामंडळाचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जाते, हे संघटना पदाधिकाऱ्याने पटवून दिले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT