कोकण

‘हर घर तिरंगा’साठी देवगडात जागृती

CD

56030

‘हर घर तिरंगा’साठी देवगडात जागृती

घरांसह आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः येत्या ९ ते १७ ऑगस्ट कालावधीत घरासह खासगी आस्थापनांवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवून जास्तीत जास्त नागरिकांचा यामध्ये सहभाग निश्‍चित करण्याचे आवाहन येथील प्रभारी गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियान ९ ते १७ दरम्यान राबवण्यात येणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांत १३ ते १५ या कालावधीत ध्वजवंदन करण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रभारी गटविकास अधिकारी श्री. जगताप यांनी मार्गदर्शन करून आवश्यक सूचना केल्या. मंचावर कृषी अधिकारी दिगंबर खराडे, विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर, विस्तार अधिकारी तुषार हळदणकर, कृषी विस्तार अधिकारी विलास कोलते उपस्थित होते. अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT