कोकण

रानभाजी पाककृती स्पर्धेत रिगल कॉलेजच्या विद्यार्थिनीचे यश

CD

ratchl७२.jpg
26O56008
चिपळूण - रानभाजी पाककृती स्पर्धेत पाहणी करताना निरीक्षक.

रानभाजी पाककृतीत ‘आर्या’ तृतीय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः सृष्टीज्ञान संस्था, मुंबई आयोजित ‘रानभाजी पाककृती स्पर्धेत’ रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम, चिपळूणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयाच्या आर्या करमरकर, सहर काझी आणि करिश्मा तानकर यांनी या स्पर्धेत यश मिळवले.
स्पर्धेत विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून पौष्टिक, पारंपरिक व नावीन्यपूर्ण पाककृती सादर करण्यात आल्या. यामध्ये  आर्या हिने तयार केलेल्या ‘भारंगी पास्ता’ या अभिनव पाककृतीने उत्कृष्ट चव, आकर्षक सादरीकरण आणि कल्पकतेच्या बळावर परीक्षकांची मने जिंकत तृतीय क्रमांक पटकावला. काझी आणि तानकर यांनीही उत्कृष्ट पाककृती सादर करून आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली. त्यांच्या सहभागाचेही सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. हॉटेल व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी केवळ आधुनिक पाककलेपुरते मर्यादित न राहता कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांचे पोषणमूल्य जतन करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, ही अभिमानाची बाब असल्याचे महाविद्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT