कोकण

सात हजार नागरिकांची आरोग्य चिकित्सा

CD

सात हजार नागरिकांची आरोग्य चिकित्सा

सिंधुदुर्गनगरीतील शिबिर; विविध संस्थांकडून व्यापक जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २२ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान राबविलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध तपासण्या, शस्त्रक्रिया आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या माध्यमातून सात हजारांहून अधिक नागरिकांना आरोग्यविषयक माहिती व मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित या अभियानाचे उद्‍घाटन २२ जुलैला माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री नीतेश राणे यांनी २३ जुलैला शिबिर स्थळास भेट देऊन पाहणी केली. अभियानांतर्गत स्तन कर्करोग तपासणी शिबिरात १९०, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणीत ८९, बोन मिनरल डेन्सिटी तपासणीत १८८, तर नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात २४१ रुग्णांनी लाभ घेतला. नेत्र शिबिरात २८ रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत २९३ रक्तपिशव्यांचे संकलन केले.
याशिवाय विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक आरोग्य जनजागृती करण्यात आली. स्थूलता, हर्निया, व्हेरिकोज व्हेन्स, मुख कर्करोग, थॅलेसेमिया, टाइप-१ डायबेटीस, मानव दूध बँक, कृत्रिम अवयव व पुनर्वसन, हृदयविकार तसेच असंसर्गजन्य आजारांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. कुडाळ येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी, वाडीहुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच ग्रामीण रुग्णालये मालवण आणि पेंडूरकट्टा यांच्या सहभागातून हे उपक्रम राबविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT