कोकण

नाना शंकरशेठ यांचे कार्य देशव्यापी

CD

56019

नाना शंकरशेठ यांचे कार्य देशव्यापी

राजेश पनवेलकर ः कुडाळात दैवज्ञ समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

कुडाळ, ता. ८ ः ‘‘एकोणिसाव्या शतकातील मुंबईचा आकार बदलण्यात नाना शंकरशेठ यांचे नाव अग्रस्थानी आहे. मुंबईत धावणाऱ्या पहिल्या रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ आहेत. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे,’’ असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाचे अध्यक्ष राजेश पनवेलकर यांनी दैवज्ञ समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी येथे केले.
भारताचे थोर राष्ट्रपुरुष नाना शंकरशेठ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दैवज्ञ समाज कुडाळ आणि दैवज्ञ महिला मंडळ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दैवज्ञ भवन, शिवाजीनगर येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा, तसेच समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा झाला. प्रा. सुभाष गोवेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, महिला मंडळ संस्थापक व माजी अध्यक्ष श्रद्धा पाटणकर, जिल्हा सराफ सचिव ॲड. संजू शिरोडकर, दैवज्ञ मंडळ कुडाळ अध्यक्ष राजू पाटणकर, महिला मंडळ अध्यक्ष स्नेहल कुडाळकर आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा सराफ संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश पनवेलकर, शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काका कुडाळकर, महिला मंडळ संस्थापिका श्रद्धा पाटणकर, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अवधूत मालंडकर, ॲड. संजू शिरोडकर, गायन क्षेत्रासाठी योगिता रायकर आदींचा सत्कार करण्यात आला. महेश ओटवणेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT