कोकण

माजी सैनिक राणेंतर्फे ध्वज निधीस देणगी

CD

माजी सैनिक राणेंतर्फे ध्वजनिधीस देणगी
सिंधुदुर्गनगरी ः सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी, तसेच दिव्यांग माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पुनर्वसनासाठी दरवर्षी ध्वजदिन निधी संकलित करण्यात येतो. या उपक्रमाला हातभार लावत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथील लिपिक-टंकलेखक तथा माजी सैनिक प्रसाद राणे (तळगाव-राणेवाडी, ता. मालवण) यांनी ५२ व्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून ध्वजदिन निधी संकलनासाठी ५ हजार २०० रुपये वैयक्तिक देणगी दिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते श्री. राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या श्री. सुकटे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रभारी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी आदी उपस्थित होते.
----
सिंधुदुर्गनगरीत १९ ला शासन योजना बैठक
सिंधुदुर्गनगरी ः इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सिंधुदुर्गमार्फत इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, तसेच समाज विकासासाठी कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्थांना योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी १९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग येथील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केली आहे. आरक्षित समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच समाज विकासासाठी कार्यरत विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
......................
न्हावेली शाळेमध्ये शनिवारी स्नेहमेळा
आरोंदा ः शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी न्हावेली शाळा क्र. २ येथे शनिवारी (ता. १५) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन, मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, माजी विद्यार्थी व माजी शिक्षक यांचे मनोगत, स्नेहभोजन, मनोरंजनात्मक कार्यक्रम व समारोप आदी कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ यांनी केले आहे.
.......................
वैभववाडीत उद्या पंचायत समिती सभा
सिंधुदुर्गनगरी ः पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT