कोकण

रत्नागिरी- उमेर सोलकरला मदतीचा

CD

rat९p३.jpg-
५६१४०
उमेर सोलकर

दहावीत यश, आता करायचेय डिझायनिंग
अस्थिव्यंग उमेरची कहाणी ; अडचणीवर करतोय मात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : जन्मतःच अस्थिव्यंग असलेल्या उमेर अशपाक सोलकर (रा. साखरीनाटे, ता. राजापूर) याने जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दहावीचे शिक्षण पूर्ण केले. डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याची त्याची इच्छा आहे.
उमेर हा अस्थिव्यंग असल्याने त्याला कधीच चालता आले नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. उमेरचे वडील रोजंदारीवर माशांच्या जाळ्या विणण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई सौ. मेहरून या गृहिणी असून उमेरची संपूर्ण जबाबदारी आणि सेवा त्या एकट्याच सांभाळतात. उमेरला विवाहित बहिण असून भाऊ मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतो. उमेर आज १६ वर्षांचा असला तरी त्याचे वजन केवळ १४ किलो आहे. तो स्वतःची कोणतीही दैनंदिन कामे करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तो आईवरच अवलंबून आहे. लहानपणापासून त्याची आई त्याला रोज उचलून शाळेत घेऊन जात असे आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा उचलून घरी आणत असे. त्याची शारीरिक ठेवण इतकी लहान होती की लहान व्हीलचेअरमध्येही तो व्यवस्थित बसू शकत नव्हता.

चौकट
अनंत अडचणी
इयत्ता नववीमध्ये असताना आई त्याला शाळेत घेऊन जात असताना दोघेही पडले. या अपघातात उमेरचा एक पाय दोन ठिकाणी मोडला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून पायात रॉड बसवण्यात आला. त्यानंतर त्याला शाळेत नेण्यासाठी दोन व्यक्तींची मदत घ्यावी लागे आणि स्ट्रेचरवरून शाळेत न्यावे लागे.
----------
चौकट २
स्ट्रेचरवरून परीक्षेला
इयत्ता १० वीमध्ये त्याच्या प्रकृतीचा विचार करून शिक्षकांनी त्याला घरी बसून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. एक शिक्षक त्याच्या घरी जाऊन शिकवत होते. दहावीची परीक्षाही त्याने स्ट्रेचरवरून परीक्षा केंद्रात जाऊन रायटरच्या मदतीने दिली. परीक्षा केंद्रात त्याला स्वतंत्र खोली आणि अतिरिक्त २० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. उमेरला दहावीत ६० टक्के गुण मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT