rat ९p५.jpg-
५६१४२
रत्नागिरी ः तालुक्यातील नेवरे येथील न्यू इंग्लीश स्कूलच्या माजी विद्यार्थीनी शाळेल पंख व ट्यूबलाईट भेट दिल्या त्यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक.
नेवरे शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून साहित्य भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः तालुक्यातील नेवरे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या २००३-०४ या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या मातृसंस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. शाळेची गरज ओळखून या माजी विद्यार्थ्यांनी १० सीलिंग फॅन आणि २५ ट्यूबलाईट्स भेट देऊन शालेय भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर घातली आहे.
या साहित्यामुळे वर्गांमधील प्रकाशव्यवस्था अधिक उत्तम होण्यासोबतच उन्हाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांमधून माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. आयोजित कार्यक्रमात २००३-०४ बॅचचे प्रतिनिधी मयुरी आरेकर, ओमकार आरेकर, परेश मोरे, मुदस्सर खान आणि रेश्मा पाटणकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून हे साहित्य शाळा प्रशासनाकडे सुपूर्द केले.
तसेच या उपक्रमासाठी सागर मायंगडे, आशिष पाटणकर, सुशांत माने, बालाजी नलावडे, सुवर्णा शेलार, प्रशांत मिरकर, रवींद्र भैरे, सागर पोळ, सुहास गुरव, नयना पवार, अस्मा पांगारे, विश्वास रामाणी, प्रथमेश पेडणेकर, अमर रांबाडे, शीतल देवरुखकर आणि स्वाती भैरे यांनी अप्रत्यक्षरीत्या मोलाचे सहकार्य केले. ‘‘आपल्या मातृसंस्थेबद्दल आदर व कृतज्ञता बाळगणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे,’’ अशी भावना यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच इतर सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती आदर ठेवून शालेय उपयोगी साहित्याची मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी उत्तम मोरे, मुख्याध्यापक श्री. महाकाळ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.