कोकण

शिक्षणासोबत कला कौशल्यही महत्त्वाचे

CD

56153
सावंतवाडी ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यास उपस्थित तहसीलदार श्रीधर पाटील, रुजुल पाटणकर व इतर.

शिक्षणासोबत कलाकौशल्यही महत्त्वाचे

तहसीलदार पाटील ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये पदग्रहण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः ‘‘पदग्रहण सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निवडणूकविषयक जागृती झाली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासह इतर कौशल्यविकास कार्यक्रमांतही सहभाग घ्यावा,’’ असे प्रतिपादन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित विद्यार्थी परिषद शपथ विधी सोहळ्यात ते बोलत होते.
स्कूलमध्ये शनिवारी (ता. ८) विद्यार्थी परिषद शपथ विधी व पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. नेतृत्व, संघभावना, जबाबदारीची जाणीव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार पाटील, शाळेचे संचालक ॲड. रुजुल पाटणकर, ‘माध्यमिक’च्या मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, ‘प्राथमिक’च्या मुख्याध्यापिका निधी सावंत, शाळेच्या समन्वयक सुषमा पालव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका सावंत यांनी परिचय केला.
नवनिर्वाचित हेड बॉय, हेड गर्ल, हाऊस कॅप्टन व व्हाइस कॅप्टन यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज व सॅश प्रदान केले. तसेच हाऊसचे ध्वज व बॅनर विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषद सदस्यांनी कर्तव्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि शाळेच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. यामध्ये हेड बॉय शौर्य चव्हाण, हेडगर्ल श्री. कोरगावकर, ‘अग्नी हाऊस’ची कॅप्टन निधी शिर्के, व्हाईस कॅप्टन योगांक करिवडेकर, ‘पृथ्वी हाऊस’ कॅप्टन नील सावंत, व्हाईस कॅप्टन कवीश पेडणेकर, ‘वायू हाऊस’ कॅप्टन पृथ्वीराज गवस, व्हाईस कॅप्टन गायत्री तानावडे, ‘जल हाऊस’ कॅप्टन रेहान सारंग, व्हाईस कॅप्टन अनिका सुकी, तर स्पोर्टस् विभाग विद्यार्थी प्रमुख यज्ञेश पवार, सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रमुख तनिष्क पवार, असेंबली विभाग विद्यार्थी प्रमुख गौरीश परब, अस्मी प्रभू तेंडोलकर, पर्यावरण विभाग विद्यार्थी प्रमुख सई नाईक, हेल्थ अँड हायजिन विभाग विद्यार्थी प्रमुख प्रत्युशा घोगले, हीना सारंग, फायनान्स विद्यार्थी प्रमुख विहान राणे, एनर्जी कॉन्झर्व्हेशन विभाग विद्यार्थी प्रमुख देवांग सारंग, गार्डनिंग विभाग विद्यार्थी प्रमुख विहान बिरमोले यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये प्रीफेक्ट म्हणून सायना अळवणी, हेरंब नाटेकर, सक्षम ओटावणेकर, आराध्य शेटवे, ऋतुजा पेडणेकर, ध्यानी बथानी, सौजन्या काजरेकर, नीलया शिंदे, लिशा सामंत, नुवैरा सय्यद यांचा सहभाग होता. श्री. पाटणकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये नेतृत्वगुणाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. समन्वयक पालव यांनी नियोजन केले. सहायय्यक शिक्षिका ग्रीष्मा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक शिक्षिका अमृता यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

Parbhani Crime: आणखी सहा जणांना अटक! ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे उलगडण्यास सुरुवात; सहा आरोपी जेरबंद लातूर, परळी, कळंबपर्यंत तपासाची व्याप्ती

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT