कोकण

युवा महोत्सव व्यक्तिमत्व विकासाचा मंच

CD

56154


युवा महोत्सव व्यक्तिमत्व विकासाचा मंच

लखमराजे भोसले ः भोसले नॉलेज सिटीमध्ये विभागीय फेरीचे उद्‍घाटन


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा मंच आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळते आणि त्यांना आपल्या प्रतिभेचे सादरीकरण करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन युवराज लखमराजे भोसले यांनी येथे केले.
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या सिंधुदुर्ग विभागीय फेरीचे उद्‍घाटन आज यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विवेकानंद सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांतील ५५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, ३१ विविध कलाप्रकारांमध्ये दिवसभर स्पर्धा रंगणार आहेत.
उद्‍घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत, लखमराजे भोसले तसेच मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे उपस्थित होते. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, जिल्हा युवा महोत्सव समन्वयक डॉ. आशिष नाईक, डॉ. नितीन वळंजू यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीचे सीईओ ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. विजय जगताप, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. रमण बाणे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. बॉनी शेराव्ह आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच देवी सरस्वतीच्या प्रतिमेला आणि नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीचे औपचारिक उद्‍घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाणे यांनी केले. उद्‍घाटन कार्यक्रमाचे निवेदन अमर प्रभू यांनी केले.
------
३१ विविध कलाप्रकारांमध्ये स्पर्धा
नीलेश सावे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. डॉ. नाईक, रत्नेश सिन्हा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विभागीय फेरीत ३१ विविध कलाप्रकारांमध्ये स्पर्धा होणार असून, दिवसभर विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. सायंकाळी उशिरा निकाल जाहीर करण्यात येणार असून रात्री बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे सरन्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT