कोकण

मासिक पाळी, स्वच्छतेचे कु़डाळ इंग्रजी शाळेत धडे

CD

56158

मासिक पाळी, स्वच्छतेचे
कुडाळ इंग्रजी शाळेत धडे

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः क.म.शि.प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा येथे ‘उत्कर्षा कार्यक्रम’ अंतर्गत मासिक पाळी व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन सत्र पार पडले. व्याख्यात्या डॉ. प्रियांका घुर्ये यांचे मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
डॉ. घुर्ये यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत मासिक पाळीची नैसर्गिक प्रक्रिया समजावून सांगितली. मासिक पाळी दरम्यान जाणवणारी लक्षणे, त्यावरील घरगुती उपाय तसेच केळी, मूग, मटकी, कुळीथ,गुळ, शेंगदाणे, खजूर, मनुका आदी पोषक पदार्थांचे महत्त्व याबाबत माहिती दिली. स्वच्छता न पाळल्यास होणारे आजार सांगितले. पाळीदरम्यान हलका व्यायाम करण्याचे फायदे यावरही मार्गदर्शन केले. मुलींनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.या व्याख्यानाला प्रशालेतील महिला शिक्षिका तसेच महिला पालक प्रतिनिधी उपस्थित होत्या. सहशिक्षिका पूर्वा राऊळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT