कोकण

काळसेत रंगला भात लावणी महोत्सव

CD

56211

काळसेत रंगला भात लावणी महोत्सव

उत्साहाचे वातावरण; चिखलात उतरून भात लावणीचा घेतला आनंद

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : पारंपरिक शेतीसंस्कृतीची जपणूक करत शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि भातशेतीला नवी ऊर्जा देण्यासाठी काळसे येथील प्रगत शेतकरी गटातर्फे भात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांसह पर्यटक आणि स्थानिकांनी प्रत्यक्ष शेताच्या चिखलात उतरून भाताची रोपे लावत या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे दिवसभर काळसेच्या शेतशिवारात प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या आगळ्यावेगळ्या महोत्सवास कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, धामापूरच्या सरपंच परब, काळसेच्या सरपंच काळसेकर, ‘आत्मा’ अध्यक्ष प्रताप चव्हाण, काळसेकर, माधुरी कुडाळकर, ‘आनंदाश्रय’ अणावचे संस्थापक बबन परब, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष गावडे, उद्यानपंडित पुरस्कार विजेते उत्तम फोंडेकर, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, प्रगत शेतकरी गटाचे अध्यक्ष श्यामसुंदर मालवणकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, कृषी सेविका स्नेहा खोत, ग्रामविकास अधिकारी शेलटकर आणि माजी विस्तार अधिकारी विनायक चव्हाण उपस्थित होते. याशिवाय शंभरहून अधिक उत्साही शेतकरी, पर्यटकांनी या लावणी महोत्सवात सहभाग नोंदवला.
सकाळपासूनच काळसे येथील शेतशिवारात भात लावणीला सुरुवात झाली. उपस्थित लोकप्रतिनिधी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून भाताची रोपे लावली. ग्रामीण जीवनशैलीशी जवळीक साधणारा आणि शेतकऱ्यांच्या अथांग मेहनतीची जाणीव करून देणारा हा अनुभव उपस्थितांसाठी अत्यंत विशेष ठरला.
शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ती कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक युगात शेतीपासून दुरावणाऱ्या युवा पिढीला पारंपरिक भातशेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य सन्मान व्हावा आणि या माध्यमातून ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी, हाच या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
---
पर्यटकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात कृषी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि पर्यटक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भात लावणी महोत्सवाची ही सुंदर परंपरा दरवर्षी अशीच पुढे सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाताच्या रोपांसोबतच कोकणची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि शेतकऱ्यांचा सन्मान रुजवणारा हा महोत्सव काळसेवासीयांसाठी आणि आलेल्या पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२५ महिलांशी लग्न, कोट्यवधींचा गंडा; आता व्याह्याविरोधात भाजप आमदाराची तक्रार, गुन्हा दाखल

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे मुख्य न्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT