56213
प्रा. हेमंत महाडिक यांचा
तळेकर ट्रस्टतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ९ : येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयातील प्राध्यापक हेमंत सुभाष महाडिक यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीसाठी पात्रता प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाचनालय यांच्यावतीने शुक्रवारी विशेष अभिनंदन करण्यात आले.
प्रा. महाडिक यांनी ‘महाराष्ट्र राज्यातील समुद्रकिनारा पर्यटनाचे विपणन’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. व्यवस्थापन शास्त्र विषयातील हा संशोधन प्रबंध विद्यापीठाने मान्य केला असून, त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यासाठी पात्र घोषित केले आहे. त्यांच्या संशोधनाला डॉ. आर. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा. महाडिक हे तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. ते स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर आणि वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, दीपक जठार, निलेश सोरप, विनोद धुरे, बापू वायंगणकर, रेश्मा तळेकर, श्रावणी मदभावे, ग्रंथपाल साक्षी तळेकर, मदतनीस नेत्रा पावसकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.