कोकण

खारेपाटण येथे रोजगाराभिमुख प्रशिक्षण

CD

56215

खारेपाटण येथे रोजगाराभिमुख प्रशिक्षण

विविध कोर्सची माहिती; विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ९ : ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे केंद्र शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत जन शिक्षण संस्थान,सिंधुदुर्ग यांच्या वतीने ग्रामीण युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात असिस्टंट पेंटिंग कोर्स,ड्रेस मेकिंग कोर्स, ब्युटिशियन कोर्स आणि हेल्पर वायरमन कोर्स शालेय अभ्यासक्रम बरोबरच खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी दिली.
या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर, शिक्षिका सारिका महिंद्रे, सतीश नाईक, दयानंद कोकाटे, सुबोध देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संचालक सुधीर पालव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रमेश खरात, हेल्पर वायरमन असिस्टंट कोर्सचे प्रशिक्षक शशिकांत मेस्त्री तसेच ड्रेस मेकिंग प्रशिक्षिका अंजली राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य संजय सानप यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर सुधीर पालव यांनी शालेय विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व, स्वयंरोजगारा च्या संधी आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी २०२५-२६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचाही गौरव करण्यात आला. हेल्पर, वायरमन अभ्यासक्रमाचे २१ विद्यार्थी तर ड्रेस मेकिंग अभ्यासक्रमाचे ४० विद्यार्थी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन प्रशालेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी जन शिक्षण संस्थानाचे हे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, आगामी शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२५ महिलांशी लग्न, कोट्यवधींचा गंडा; आता व्याह्याविरोधात भाजप आमदाराची तक्रार, गुन्हा दाखल

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे मुख्य न्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT