कोकण

रत्नागिरी - संक्षिप्त

CD

लांज्यात दिव्यांगांसाठी
गुरुवारी विशेष शिबिर
लांजा ः जिल्हा रुग्णालयातर्फे लांजा ग्रामीण रुग्णालय येथे गुरुवारी (ता. १३) सकाळी १० ते १ या वेळेत दिव्यांग नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात दिव्यांग नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचाराबाबत सल्ला देण्यात येणार आहे. यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ तसेच भौतिकोपचार तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील पात्र दिव्यांग नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विटेकर यांनी केले आहे.
-----------------
लांज्यात मंगळवारी
रानभाजी महोत्सव
लांजा ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे ११ ऑगस्टला सकाळी १० ते ५ या वेळेत कुलकर्णी काळे छात्रालय येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रानभाजी प्रदर्शन, विक्री तसेच रानभाजी पाककृती स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी रानभाजीचा पदार्थ तयार करून आणावा. त्यासोबत पाककृती व पौष्टिक गुणधर्माची माहिती द्यावी. पदार्थांची मांडणी सकाळी १० ते १०.३० या वेळेत करावी. विजेत्यांना १५ ऑगस्टला बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी १० ऑगस्टला सायंकाळी ४ वाजेपर्यंत आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गौरी शेट्ये यांच्याकडे नोंदणी करावी.
----------------
भक्ती सावंत यांची
सचिवपदी निवड
गावतळे ः दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूलच्या प्राचार्या भक्ती सावंत यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर विभाग विद्या समितीच्या सचिवपदी निवड झाली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे आणि विद्या समिती अध्यक्ष राम साळुंखे यांनी त्यांचे अभिनंदन केले. सावंत यांनी वी. रा. घोले हायस्कूल, वाकवली, श्री शिवाजी हायस्कूल, करंजाणी आणि गावतळे येथे ३४ वर्षांहून अधिक काळ अध्यापन केले आहे. २०२४ मध्ये गावतळे येथे प्राचार्या म्हणून रुजू झाल्यानंतर शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
---------------
रुखी शाळेचे
चित्रकलेत यश
गावतळे ः दापोली तालुक्यातील फणसू केंद्राच्या चित्रकला व रंगभरण स्पर्धा फणसू केंद्रशाळेत झाल्या. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत २२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद रुखी मराठी शाळेतील २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गट क्रमांक ३ (इयत्ता सहावी ते सातवी) मध्ये कार्तिकी मंगेश भागणे हिने प्रथम, तर आर्या विनोद भागणे हिने तृतीय क्रमांक मिळविला. गट क्रमांक २ (इयत्ता तिसरी ते पाचवी) मध्ये तन्मय मनोहर राळे याने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती व युवावर्गाने अभिनंदन केले.
----------------
मुगीजमध्ये रोपांचे
मोफत वाटप
दापोली ः कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभाग, कोकण कृषी विद्यापीठ वाहनचालक संघटना आणि ग्रामीण जागृती कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत बीजांकुर ग्रुपतर्फे मुगीज येथे वेंगुर्ला-४ काजू कलम व श्रीवर्धनी सुपारी रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
डॉ. प्रवीण झगडे यांनी काजू व सुपारी लागवडीचे तंत्र, रोपांची निगा आणि उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विजय देसाई, डॉ. नरेंद्र प्रसादे आणि डॉ. संतोष वरवडेकर यांनी फळबाग विकास व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. मुगीज येथील ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक काजू कलम आणि एक सुपारीचे रोप देण्यात आले. कार्यक्रमाला विभागप्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, रावे केंद्रप्रमुख डॉ. विजय देसाई, डॉ. नरेंद्र प्रसादे, डॉ. प्रवीण झगडे, वाहनचालक संघटनेचे खजिनदार बाळकृष्ण ठाकरे आदी उपस्थित होते.
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर दगड, चिखल आणि चपला फेकल्या, 'चोर-चोर'च्या घोषणा

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

RTO सोबतचा वाद, समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा करून चालक पसार, वाहनांच्या लाबंच लांब रांगा, नेमकं काय घडलं?

Nalasopara: मुलींची छेड काढल्याचा जाब विचारल्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; कोयत्याने सपासप वार, घटना CCTVत कैद

Malegaon Sugar: माळेगाव कारखान्यात नितीन शेंडे यांची बिनविरोध वर्णी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सूचनेनुसार निर्णय

SCROLL FOR NEXT