कोकण

राजापूर : भारतीय संस्कृती पाच हजार वर्षांनंतरही टिकून

CD

rat9p18.jpg-
56231
राजापूर ः राजापूर नगर वाचनालयाच्यावतीने आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. मिलिंद कुलकर्णी सोबत प्रमोद जोशी.
-------------
भारतीय संस्कृती पाच हजार वर्षांनंतरही टिकून
डॉ. मिलिंद कुलकर्णीः राजापूर नगर वाचनालयातील व्याख्यानाला प्रतिसाद
राजापूर, ता. ९ : जगामध्ये सर्वात जुनी मानली जाणारी भारतीय संस्कृती केवळ जुन्या रूढी-परंपरा नसून मानवी जीवनाला समृद्ध करणारी जीवनपद्धती आहे. जगातील अनेक संस्कृती कालौघात नष्ट झाल्या, मात्र आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे भारतीय संस्कृती पाच हजार वर्षांनंतरही टिकून आहे. ही समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
राजापूर नगर वाचनालयाच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘भारतीय संस्कृती आणि आपण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कार्यवाह जयंत अभ्यंकर, उपाध्यक्ष जयेश हर्डीकर, सहचिटणीस सुहास ओळकर आणि प्रसिद्ध कवी प्रमोद जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या ओघवत्या शैलीत संस्कृतीचे पैलू उलगडताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीने जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’ (संपूर्ण जग हेच एक कुटुंब) हा विचार दिला. ज्येष्ठांचा आदर करणे आणि अतिथींचा सन्मान करणे ही आपली मुख्य ओळख आहे. आयुर्वेदासह ज्योतिषशास्त्र, खगोलीय ज्ञान आणि शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी ‘योग’ ही अमूल्य देणगी भारताने जगाला दिली.’’
सोहळ्यात दहावीच्या परीक्षेत तालुक्यात विज्ञान विषयात प्रथम आलेला सिद्धेश शिंदे आणि मराठी विषयात प्रथम आलेली समीक्षा बंडगर यांचा डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय सुहास ओळकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन पद्मजा कारेकर यांनी केले, तर अनघा करंदीकर यांनी आभार मानले.

चौकट
सांस्कृतिक पाळेमुळे विसरू नये
झाडे, नद्या आणि प्राण्यांना पूजनीय मानून निसर्गरक्षणाचा संदेश आपल्या संस्कृतीत दिला गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना स्वतःची सांस्कृतिक पाळेमुळे विसरू नयेत. परकीय अंधानुकरणाऐवजी विवेकनिष्ठ दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी आवर्जुन सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर दगड, चिखल आणि चपला फेकल्या, 'चोर-चोर'च्या घोषणा

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

RTO सोबतचा वाद, समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा करून चालक पसार, वाहनांच्या लाबंच लांब रांगा, नेमकं काय घडलं?

Nalasopara: मुलींची छेड काढल्याचा जाब विचारल्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; कोयत्याने सपासप वार, घटना CCTVत कैद

Malegaon Sugar: माळेगाव कारखान्यात नितीन शेंडे यांची बिनविरोध वर्णी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सूचनेनुसार निर्णय

SCROLL FOR NEXT