विद्यार्थ्यांना रेनकोटचे
रोटरी क्लबतर्फे वाटप
चिपळूण, ता. १० : विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणी येऊ नयेत, या सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब पिंपरी टाऊनच्यावतीने ओमळी न्यू इंग्लिश स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब पिंपरी टाऊनचे अध्यक्ष संतोष भालेकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, ओमळीचे उपाध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सुभाष जाधव म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन रोटरी क्लबने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांसाठी तो निश्चितच लाभदायक आहे.’ संत गाडगेबाबा परीट समाजसंस्थेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सुभाष कदम यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांसाठी रेनकोट उपलब्ध करून देण्यात आले. या वेळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पांडुरंग कामळे, खजिनदार श्रीराम पवार, संचालक सुभाष कदम, मुख्याध्यापक सुधाकर गंगावणे, उपशिक्षक अजित आंबवकर, मिलिंद विखारे, सुयोग कदम, उपशिक्षिका खोत, चौधरी, जाधव आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.