चिपळुणात जिल्हा साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण : रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केलेल्या येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था सभागृहात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत होते. सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
या सभेमध्ये वाचनालयाला मंजूर झालेल्या आगामी ‘जिल्हा साहित्य संमेलना’बाबत सभासदांना सविस्तर माहिती देण्यात आली. चिपळूणमध्ये होणारे हे साहित्य संमेलन भव्य व दिमाखदारपणे आयोजित करण्यासाठी शहरातील सर्व वाचनालये, साहित्यप्रेमी संस्था, शाळा-महाविद्यालये, विविध मंडळे आणि नागरिक यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हे संमेलन संयुक्तपणे आयोजित करण्याबाबतही सभेत विचारविनिमय झाला.
दरम्यान, वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ या पुस्तकाला तृतीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ वाचक शालन रानडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक प्रदीप पवार यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. या प्रसंगी वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर, उपाध्यक्ष रमण डांगे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.