kan१०३.jpg
५६३५७
कणकवली : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले.
युवा महोत्सवात अभियांत्रिकी
कॉलेजची दमदार कामगिरी
सांस्कृतिक स्पर्धांत विद्यार्थ्यांनी पटकावले सहा क्रमांक; अंतिम फेरीसाठी निवड
कणकवली, ता. १० : मुंबई विद्यापीठाचा ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव २०२६-२७ सावंतवाडी येथे नुकताच झाला. यात सिंधुदुर्ग विभागीय फेरीत एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. वक्तृत्व, साहित्यिक आणि कलात्मक कौशल्याचे प्रभावी सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी सहा क्रमांक पटकावले.
वक्तृत्व स्पर्धेत तनया पांचाळ हिने प्रथम क्रमांक मिळविला. कथा कथन मध्ये गायत्री नाईक हिने द्वितीय क्रमांक पटकावला. वाद विवाद स्पर्धेच्या मराठी गटात शुभम खरात आणि राजनंदिनी चौगुले या जोडीने द्वितीय क्रमांक मिळविला. तर हिंदी इंग्रजी गटात भार्गवी कवटकर आणि साह मुन्ना यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पोस्टर निर्मिती आणि त्वरीत चित्रकला या दोन्ही स्पर्धांमध्ये तनय पार्टे याने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या पुढील अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. अंतिम फेरीत हे विद्यार्थी महाविद्यालयासह सिंधुदुर्ग विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या विद्यार्थ्यांना डॉ. एस. टी. माने यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.