कोकण

बुद्ध विहाराविषयी वस्तुस्थिती मांडणार

CD

बुद्ध विहारासंबधी वस्तुस्थिती मांडणार
संघर्ष समितीचा निर्णय; मंत्रालय स्तरावर बैठकीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः थिबा राजा कालीन बुद्धविहाराच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराला तातडीने उत्तर देण्याबरोबरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून संबंधित विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांसमोर या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती, रत्नागिरीची कार्यकारिणीची बैठक शनिवारी (ता. ८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एल. व्ही. पवार होते. या बैठकीत ज्या धार्मिक संस्थेने जागेची परिपूर्ण प्रस्तावासह मागणी केली आहे त्या संस्थेला पुढील प्रशासकीय तसेच कायदेशीर पाठपुरावा करण्याचे अधिकार देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत संघर्ष समिती संबंधित संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराला तातडीने उत्तर देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन संबंधित खात्याचे अधिकारी आणि मंत्र्यांना थिबा राजा कालीन बुद्धविहाराबाबतची वस्तुस्थिती आणि समितीची भूमिका सविस्तरपणे समजावून सांगण्याचे ठरले.
या बैठकीस कार्याध्यक्ष अनंत सावंत गुरूजी, उपाध्यक्ष प्रकाश पवार, सचिव अमोल जाधव, उपसचिव रूपेश कांबळे, सल्लागार सुनील आंबुलकर, शिवराम कदम, दीपक जाधव, प्रदीप पवार, दिवेन कांबळे, रत्नदीप कांबळे, केतन पवार, राहुल पवार, सुनील पवार, अनंत पवार, राजन जाधव, राजेंद्र कांबळे, अजित जाधव, विजय मोहिते यांच्यासह संघर्ष समितीचे बहुसंख्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
---
कार्यकारिणीचा संकल्प
संघर्ष समितीचा हा लढा केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित न ठेवता तालुक्यातील गावागावांत पोहोचवण्याचाही निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. थिबा राजा कालीन बुद्धविहाराच्या संरक्षणाच्या संघर्षाची ज्योत प्रत्येक गावात प्रज्वलित करण्याचा संकल्प कार्यकारिणीने केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

SCROLL FOR NEXT