कोकण

कलावंतांना न्याय मिळवून देण्याचे योगदान

CD

Rat१०p११.jpg
26O56360
मंडणगड ः कलाभवन येथे कै. शाहीर लोखंडे गुरुजींना श्रद्धांजली वाहताना उपस्थित शाहीर, कुटुंबीय आणि कलावंत.
---
कलावंतांच्या हक्कासाठी लोखंडे गुरुजींचा लढा
अस्मिता केंद्रे ः मंडणगडमधील श्रद्धांजली सभेत कार्याचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १० : ‘लोककला, शाहिरी आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहून कै. शाहीर हरिश्चंद्र लोखंडे उर्फ लोखंडे गुरुजी यांनी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना शासनाच्या मानधन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जागृती व प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले. वृद्ध कलाकारांना केवळ मानधनच नव्हे तर त्यांच्या कलेचा आणि योगदानाचा सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी केले.
लोककला मराठी शाहीर परिषद, मंडणगड शाखेच्यावतीने कलाभवन येथे ९ ऑगस्ट रोजी आयोजित कै. लोखंडे गुरुजी यांच्या श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. या वेळी जिल्ह्यातील शाहीर, लोककलावंत, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. केंद्रे म्हणाल्या, लोखंडे गुरुजी यांचे कार्य केवळ शाहिरी कला सादर करण्यापुरते मर्यादित नव्हते. ग्रामीण भागातील अनेक कलाकारांनी आयुष्यभर लोककलेची सेवा केली; मात्र वयाच्या उत्तरार्धात त्यांच्याकडे आर्थिक आधाराचा अभाव होता. अशा वृद्ध साहित्यिक व कलाकारांपर्यंत शासनाच्या मानधन योजनेची माहिती पोहोचवून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लोखंडे गुरुजींनी पुढाकार घेतला. कलाकाराच्या कलेचा सन्मान त्याच्या हयातीत झाला पाहिजे, ही लोखंडे गुरुजींची भूमिका होती. वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना शासनाच्या मानधन योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जागृती केली. अनेक कलाकारांना मानधन मिळवून देण्याबरोबरच त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी कै. लोखंडे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी लोककला मराठी शाहीर परिषद मध्यवर्ती कमिटीचे उपाध्यक्ष अनंत केंद्रे, मंडणगड शाखेचे अध्यक्ष तुकाराम रेणोसे, दापोलीचे अध्यक्ष अनिल शेडगे, नगरसेवक विनोद जाधव, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, सखाराम माळी यांच्यासह सर्व शाहीर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

Vastu Tips: घरामध्ये मोरपीस ठेवावे की नाही? वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे आणि नियम

SCROLL FOR NEXT