कोकण

महेश नाईक यांना महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार प्रदान

CD

wt1014.jpg
56371
सिंधुदुर्गनगरीत : येथे युवा भजनी कलाकार बुवा महेश नाईक यांना मान्यवराच्या उपस्थितीत मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

महेश नाईक यांना महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० : सिंधुदुर्गनगरीत भव्य सोहळ्यात विलवडे येथील युवा भजनी कलाकार बुवा महेश मनोहर नाईक यांना त्यांच्या उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि समाजहिताच्या कार्याबद्दल ‘महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार २०२६’ मान्यवराच्या उपस्थिततीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महेश नाईक गेल्या १५ वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असून हा वारसा त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते डबलबारीच्या माध्यमातून प्रबोधन, मनोरंजन करताना संगीत वारसा जपत आहेत. युवा पिढीला संगीत कलेकडे वळवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. ते संगीत विशारद परीक्षेत उत्तीर्ण झाले असून संगीत विशारद गुरुवर्य श्रीमान राऊळ यांच्याकडे संगीत शिक्षण घेत आहेत. नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि यश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन - सिंधुर्गनगरी २०२६’ चे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, ज्येष्ठ संगीतकार अतुल दिवे, चौकशी अधिकारी विजय चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुषार शिवशरण,सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर, ज्येष्ठ दशावतार कलावंत दादा राणे-कोनस्कर आणि राज्य पत्रकार संघाचे राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्सचे चिफ एडिटर तथा स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात, ऋतुजा राजेश परब यांनी महेश नाईक यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT