56374
‘निसर्गाची देणगी-आपल्या ताटातील समृद्धी’
कुडाळ हायस्कूलमध्ये संदेश; रानभाज्या प्रदर्शन, पाककृती स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः निसर्गाची देणगी असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे औषधी व पौष्टिक गुण तसेच पारंपरिक आहारातील त्यांचे स्थान विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने येथील कुडाळ हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज येथे ‘निसर्गाची देणगी-आपल्या ताटातील समृद्धी’ या संकल्पनेवर आधारित रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा झाली.
कुडाळ हायस्कूलच्या जीवशास्त्र प्रयोगशाळेत हा कार्यक्रम उत्साहात झाला. विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच त्यापासून तयार केलेल्या पारंपरिक व पौष्टिक पाककृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. रानभाज्यांचे संवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि आरोग्यदायी आहार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर , तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र विभागाचे डॉ. आर. वाय. ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट होते. संस्थेचे उपाध्यक्ष का. आ. सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, उपमुख्याध्यापक आर. डी. तेली, उपप्राचार्य एन. के. साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्षा शिरवलकर यांनी स्थानिक रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात शिरसाट यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानाचे जतन करून पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचे आवाहन केले. रानभाज्या पाककृती स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. आर. वाय. ठाकूर, पी. बी. कदम, एस. के. वालावलकर यांनी काम पाहिले. पी. एस. ढेरे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. ए. नाखरे यांनी परिचय केला. पी. एस. लाड यांनी सूत्रसंचालन केले. एस. एम. मोहिते यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.