कोकण

रत्नागिरीत भाजपची तिरंगा बाईक रॅली

CD

rat10p14.jpg-
56409
रत्नागिरी : भाजपतर्फे सोमवारी तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.
------------

रत्नागिरीत भाजपची
तिरंगा बाईक रॅली
रत्नागिरी, ता. १० : हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर मंडलाच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात भाजपच्या महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या सूचनेनुसार ही रॅली काढण्यात आली. शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात रॅली झाली. मारूती मंदिर येथून रॅलीला सुरवात झाली. माळनाका, जयस्तंभमार्गे स्वा. सावरकर चौकमार्गे भाजप जिल्हा कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने आणि हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा, दुचाकींवर लावलेले राष्ट्रध्वज यामुळे शहर दुमदुमले. या तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रत्नागिरी शहरातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या वेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, संयोजक संतोष सावंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजिंक्य केसरकर, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, उपाध्यक्ष राजू भाटलेकर, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मंदार खंडकर उपस्थित होते.

कोट
रत्नागिरीकरांनी तिरंगा बाईक रॅलीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आपल्या शहरातील राष्ट्रभक्तीची ताकद दाखवणारा आहे. तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागृत राहावी, हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
- दादा ढेकणे, शहराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT