आरवली-माखजन रस्ता खड्ड्यांत
संगमेश्वर, ता. १० ः संगमेश्वर तालुक्यातील आरवली-माखजन मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. कोंडिवरे गावाजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रात्रीच्यावेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. कोंडिवरे गावातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक ठिकाणी तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज घेत वाहने चालवावी लागत असून, वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.