कोकण

एसटीला पावणेतीन लाख उत्पन्न

CD

P26O56583
एआय चित्र
‘आवडेल तेथे प्रवास’ची चलती
एसटीला पावणेतीन लाख उत्पन्न; १८० पासची विक्री
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत रत्नागिरी विभागातून १८० पासची विक्री झाली. त्यामधून एसटीला २ लाख ९० हजार ७७० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचे पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पासच्या माध्यमातून पर्यटकांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी एसटीच्या साध्या तसेच शिवशाही बसमधून प्रवास करता येतो. उन्हाळी सुटीच्या कालावधीत पर्यटकांनी धार्मिक तसेच पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी या योजनेचा वापर केला. एप्रिलमध्ये चार आणि सात दिवसांचे मिळून ४९ पास विकले गेले. त्यातून ७६ हजार ८१८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेमध्ये पास विक्रीत वाढ झाली असून, ७० पासची विक्री झाली. त्यातून १ लाख ६ हजार ६७८ रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले. जूनमध्येही पास विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या महिन्यात ६१ पासची विक्री झाली. त्यातून १ लाख ७ हजार २७४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशा प्रकारे तीन महिन्यांत १८० पासची विक्री होऊन २ लाख ९० हजार ७७० रुपयांचे उत्पन्न मिळाले. या योजनेचा लाभ घेत पर्यटकांनी अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, मुंबई, पुणे यांसह विविध धार्मिक व पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. कोकणातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे, समुद्रकिनारे आणि प्राचीन मंदिरांनाही पर्यटकांनी पसंती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT