कोकण

सैनिक संकुलासाठी 15 ऑगस्टला उपोषण

CD

26O56629
एआय चित्र
चिपळुणात ‘सैनिक संकुल’ उभारा
माजी सैनिकांची मागणी; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी उपोषण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः चिपळूण व परिसरातील आजी-माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी सर्वसोयीयुक्त ‘सैनिक संकुल’ उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी सैनिकांकडून करण्यात आली आहे. या हक्काच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपोषण करणार आहेत.
चिपळूणसह लगतच्या तालुक्यांमध्ये माजी सैनिकांची संख्या लक्षणीय आहे; मात्र, वैद्यकीय उपचार, कॅन्टीन सुविधा आणि इतर प्रशासकीय कामांसाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे सैनिक संकुल केवळ रत्नागिरीच नव्हे तर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सैनिकांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांना आणि त्यांच्या परिवाराला हक्काच्या सुविधा एकाच छताखाली मिळण्यासाठी हे संकुल काळाची गरज आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या उपोषणात समस्त माजी सैनिक व त्यांच्या परिवाराने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘सैनिक संकुल’मध्ये या सुविधा द्या...
प्रस्तावित ‘सैनिक संकुल’मध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू विनासायास आणि रांगेत न थांबता मिळण्यासाठी प्रशस्त उपहारगृह, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबासाठी तज्ज्ञ डॉक्टर व उत्तम वैद्यकीय उपचार सुविधा, शासकीय योजनांच्या माहितीसाठी स्वतंत्र कार्यालय, सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या स्थानिक तरुण-तरुणींना मोफत मार्गदर्शन व अभ्यासाची सोय आणि सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह तसेच दूरवरून कामानिमित्त येणाऱ्या माजी सैनिकांना अल्पदरात निवासाची व्यवस्था, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT