कोकण

आरवली रोड रेल्वेस्टेशनवरील जीर्ण शेड धोकादायक

CD

rat११p१०.jpg-
P26O56550
सावर्डे: आरवली रोड स्थानकावरील मोडकळीस आलेले प्रतिक्षागृहाचे छप्पर.
---
रेल्वे शेडचा आधारच धोकादायक
आरवली स्टेशनवरील वास्तव; प्रवाशांचा जीव टांगणीला
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ११ ः कोकण रेल्वेमार्गावरील आरवली रोड रेल्वेस्टेशन हे कुचांबे, माखजन, खेरशेत, शिंदे-आंबेरी, कुंभारखाणी बुद्रुक, नांदगाव व येगाव यांसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील गावांसाठी अत्यंत आहे. रोज शेकडो प्रवासी येथून प्रवास करतात; मात्र, या स्टेशनच्या फलाटावरील कौलारू शेड जीर्ण झाली असून, ते प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थानक परिसरातील मुख्य दळणवळणाचे साधन आहे. येथे तुतारी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आणि मडगाव पॅसेंजर या गाड्यांना थांबा आहे. याशिवाय परिसरातील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे आणि ऐतिहासिक मंदिरांना भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठीही हेच सोयीचे रेल्वेस्टेशन आहे. रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी दुसरी कोणतीही सुरक्षित जागा नसल्याने प्रवाशांना याच धोकादायक शेडखाली ताटकळत उभे राहावे लागते. कोकणातील दमट हवामान आणि मुसळधार पावसामुळे शेडच्या लोखंडी खांबांना व पाईपांना मोठा गंज चढला आहे. छताच्या कौलांना तडे गेल्याने पावसाळ्यात फलाटावर सतत पाणी ठिबकते, ज्यामुळे संपूर्ण परिसर निसरडा बनतो. वादळीवाऱ्यात ही शेड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
---
या आहेत मागण्या
* गंजलेल्या शेडचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
* जुनी फुटलेली कौले काढून तिथे गंजरोधक आणि मजबूत शेड उभारा
* पाणी ठिबकल्यामुळे निसरड्या झालेल्या फलाटावर नवीन फरशा बसवा
---
कोट १
‘रेल्वे प्रशासनाला या स्थानकातून दररोज सरासरी दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या मानाने प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. लोकप्रतिनिधींनीही या गंभीर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’
- मंगेश परकर, सामाजिक कार्यकर्ते, आरवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

"तयारी सुरू..." Vaibhav Sooryavanshi च्या अवघ्या दोन शब्दांच्या पोस्टने वेधलं लक्ष; Video शेअर करत प्रतिस्पर्ध्यांना इशारा

JSSC JE Paper Leak : झारखंडमधील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या संचालकाला मुंबईतून अटक

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी संपली, नेमकं काय घडलं? वाचा...

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT