कोकण

चिपळुणात बाप्पाच्या आगमनाचे वेध

CD

Rat11p20.jpg -
56560
चिपळूण : गणपती कारखान्यात गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे.
---------------

चिपळुणात बाप्पाच्या आगमनाचे वेध
तयारीला सुरवात; बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण
चिपळूण, ता. ११ : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने चिपळूण शहरासह तालुक्यातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठ्या आणि जिव्हाळ्याच्या सणांपैकी एक आहे. चिपळूण शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे गणेशोत्सव जवळ येताच गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण होते. मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त राहणारे चाकरमानीही गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होण्याच्या तयारीत आहेत.
गणेशमूर्तींच्या कारखान्यांमध्येही सध्या लगबग सुरू आहे. विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मूर्तींना रंगरंगोटी आणि अंतिम रूप देण्याचे काम कारागिरांकडून वेगाने केले जात आहे. आपल्या घरातील बाप्पाची मूर्ती आगळीवेगळी आणि आकर्षक असावी, यासाठी भक्तांकडून मूर्तीकारांकडे आगाऊ नोंदणी केली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणची बाजारपेठही सज्ज होत आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य, फुले, हार, सजावटीच्या वस्तू, विद्युत रोषणाई, मखर तसेच अन्य साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

चौकट
चाकरमान्यांच्या आगमनाचीही प्रतीक्षा
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे यांसह अन्य शहरांमध्ये राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने चिपळूणमध्ये येतात. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता कुटुंबीयांच्या भेटीगाठींचाही सोहळा ठरतो. घरातील ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

SCROLL FOR NEXT